Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: सरपंचाला मारहाण, गुन्हा दाखल

अहमदनगर ब्रेकिंग: सरपंचाला मारहाण, गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar:  गावातील अंगणवाडी वेळेवर का उघडली नाही म्हणून सरपंच यांनी अंगणवाडीच्या वरीष्ठ महिला पर्यवेक्षक यांच्याकडे तक्रार केली. याचा राग आल्याने घोडेगाव येथील व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी सरपंचास मारहाण.

Sarpanch assaulted, case registered

जामखेड : गावातील अंगणवाडी वेळेवर का उघडली नाही म्हणून सरपंच यांनी अंगणवाडीच्या वरीष्ठ महिला पर्यवेक्षक यांच्याकडे तक्रार केली. याचा राग आल्याने घोडेगाव येथील व जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांनी सरपंचास मारहाण केली. या प्रकरणी बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे, शंकर विष्णु भोंडवे व अनिल उर्फ महावीर शिवाजी कडु सर्व रा. घोडेगाव ता. जामखेड या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घोडेगाव येथील सरपंच शरद भास्कर भोंडवे उर्फ जगताप यांनी दि.२९ नोव्हेंबर रोजी गावातील अंगणवाडी क्र.२३ ही सकाळी १० वाजता उघडली नव्हती. या अंगणवाडीची दैनंदिन शासकीय वेळ सकाळी ९ ते २ अशी आहे. त्यामुळे सरपंच शरद जगताप यांनी सरपंच या नात्याने या अंगणवाडीची तक्रार सोनेगावच्या बीट पर्यवेक्षिका आढाव मॅडम यांच्याकडे अंगणवाडी वेळेवर उघडत नसल्याबाबत तक्रार केली होती.

घोडेगाव येथील या अंगणवाडीत जामखेड बाजार समितीचे संचालक विष्णु शामराव भोंडवे यांची पत्नी त्रिशाला विष्णु भोंडवे या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. तक्रार केल्यामुळे विष्णु भोंडवे यांनी सरपंचास ग्रामपंचायत कार्यालयात येऊन दम देखील दिला होता. दरम्यान दि.३ जानेवारी २०२४ रोजी सरपंच हे गावातील जिल्हा परिषद शाळेतील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमास उपस्थित होते. यानंतर त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मदतनीस महिला व अंगणवाडी सेविका आल्या व त्यांनी सरपंच शरद जगताप यांना सांगितले की, संपुर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा संप सुरू आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही ग्रामपंचायतच्या पाठिंब्याचे पत्र द्या असे बोलत होते. या वेळी शंकर विष्णु भोंडवे, बाजार समितीचे संचालक, विष्णु शामराव भोंडवे हे त्या ठिकाणी आले व सरपंच शरद जगताप यांना मारहाण केली तर अनिल उर्फ महावीर शिवाजी कडु याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर जखमी झालेले सरपंच शरद भास्कर भोंडवे यांना तातडीने पुढील उपचारासाठी नगर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर बरे झाल्यावर सरपंच शरद जगताप दि.६ जानेवारी २०२४ रोजी खर्डा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे, कॉ. रईस खलील शेख, पो कॉ प्रविण थोरात हे करत आहेत.

Web Title: Sarpanch assaulted, case registered

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here