ब्रेकिंग न्यूज! नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा
Breaking News: येवल्यात नायलॉन मांजाने जखमी होण्याची ही पंधवड्यातील दुसरी घटना.
येवला: जिल्ह्यातील येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा केला जातो परंतु याच पतंगोत्सवला नायलॉन मांजा ची नजर लागली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी याच नायलॉन मांजाने गळा कापला आहे.
नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी असतांना देखील सर्रासपणे विकला जात आहे. याकडे पोलिस यंत्रणांचे लक्ष नसल्याकारणाने असे प्रकार होत आहे. अशी भावना सामान्य येवलेकर व्यक्त करत आहे.
संक्रांतीचा सण एक दिवसावर असताना शहरात पतंगोत्सवही जोरात साजरा होत आहे. मात्र, या पतंगोत्सवात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा काही ठिकाणी वापर होत असून त्यामुळे कळवण येथील एका तरुणाचा गळा कापल्याने गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. १३) घडली आहे.
कळवण येथून येवल्यातील रेल्वेस्टेशन परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पैठणी घेण्यासाठी आलेला नीरज सुमीत राठोड (वय ३०, रा. कळवण) हा दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला औषधोपचारासाठी तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत राठोड याच्या गळ्याला तब्बल आठ टाके पडले आहेत.
येवल्यात नायलॉन मांजाने जखमी होण्याची ही पंधवड्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मागील आठवड्यातच एका सात वर्षांच्या मुलाचा नायलॉन मांजाने गळा कापला होता.
मकर संक्रात सणाच्या पाश्वभूमीवर जिल्हाभरात पतंगोत्सव साजरा होत असल्याने नायलॉन मांजामुळे पशू, पक्षी व मानवी जिवीतास निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी शहर व जिल्ह्यात नायलॉन मांजा व धारदार धातूचे आवरण असलेला घातक मांजा वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र अशाप्रकारच्या अपघातांमुळे बंदी असतानाही नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कळवण येथून येवल्यात आलेल्या राठोड याचा नायलॉन मांजाने गळा कापल्याने त्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्याच्या मानेतून होणारा रक्तस्त्राव दिसल्याने परिसरातील नागरिक त्याच्या मदतीला धावले, त्यांनी राठोड याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल कले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याच्या जखमेवर आठ टाके पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मकरसंक्रांत सण अवघा एक दिवसावर असताना शनिवारी दुसरी घटना घडल्याने परिसरातील दुचाकी वाहन चालकांसह नागरिकांमध्येही घबराटीचे वातावरण पसरले झाले आहे. या घटनेतील जखमी तरुण राठोड पैठणी खरेदीसाठी कळवणहून दुचाकीवर आलेला होता.
तो रेल्वे स्टेशन भागातून जात असताना रस्त्याने गळ्यात नायलॉन मांजा अडकल्याने त्याचा गळा कापला गेला. पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या आवाहनानंतरही शहरात चोरी-छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे अशा घटनांवरून समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Web Title: young man’s throat was cut with a nylon cloth
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News