Home अहमदनगर मेहुण्यानेच मारला तिजोरीवर डल्ला ! आरोपीकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

मेहुण्यानेच मारला तिजोरीवर डल्ला ! आरोपीकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

Breaking Crime News | Ahmednagar: तिजोरीवर डल्ला मारणारा व्यावसायिकाचा मेहुण्याने डल्ला मारल्याचे आले समोर.

brother-in-law killed the safe 16 lakhs worth of goods seized from the accused

अहमदनगर: एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिमखाना परिसरात व्यावसायिकाच्या घरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. घरातील तिजोरीवर डल्ला मारणारा व्यावसायिकाचाच मेहुणा आरोपी निघाला. सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा सुमारे सोळा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

सूरज प्रकाश लोढा (वय २९, रा. सावली सोसायटी, भूषणनगर, अहमदनगर) असे चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

जावई व बहीण घराबाहेर गेल्यानंतर लोढा याने ‘प्लॅनिंग’ करून ही घरफोडी केली. चोरी ही लोढा याने केली असावी, असा थोडाही संशय गांधी कुटुंबीयांना आला नाही. गुन्ह्याची उकल झाल्यानंतर आरोपी हा घरातीलच असून, लोढा असल्याची माहिती पोलिसांनी गांधी कुटुंबीयांना दिली. त्यानंतर सर्वच नातेवाईक अवाक्‌ झाले.

जिमखाना परिसरात सुजय सुनील गांधी (वय ३३) यांचे घर असून, गांधी किराणा व्यावसायिक आहेत. ३० डिसेंबर रोजी गांधी कुटुंब नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी बुरुडगाव येथे गेले होते.

चोरट्याने घराचे कुलूप तोडून रोख, दागिने असलेली तिजोरीच चोरून नेली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गांधी यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासासाठी एलसीबी प्रमुख दिनेश आहेर यांनी तत्काळ पथके रवाना केली होती. हा गुन्हा लोढा याने केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तेरा लाख २६ हजारांचे सोन्याचे दागिने, दोन लाख ४ हजार रोख, तिजोरी, गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.

एलसीबीच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक आरोपी मोपेडवरून आल्याचे दिसून आले. त्यानंतर तांत्रिक विश्र्लेषणाची पोलिसांनी मदत घेतली, तसेच शहरातील पतसंस्था, गोल्ड लोन देणाऱ्या फायनान्स कंपन्यांकडे दरम्यानच्या काळात कोणी सोने गहाण ठेवले का, याची माहिती खबऱ्यांमार्फत काढली. दरम्यान, गांधी यांचा मेहुणा लोढा याने एका फायनान्स कंपनीत काही दागिने गहाण ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ लोढा याला ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: brother-in-law killed the safe 16 lakhs worth of goods seized from the accused

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here