Home सांगली फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन तिघांनी तीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार

फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन तिघांनी तीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार

Breaking Crime News: फिरायला जाऊ असे सांगत तिन्ही अल्पवयीन मुलींना लॉजवर नेलं. त्यानंतर तिघांनी तीन मुलीसोबत लैंगिक आत्याचार केले. याप्रकरणी तिन्ही तरुणांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा.

sexually assaulted three girls by taking them to a lodge asking them to go for a walk

सांगली:  तीन तरुणांनी इन्स्टाग्रामवरुन तीन अल्पवयीन तरुणींशी ओळख वाढवली. त्यानंतर फिरायला जाऊ असे सांगत तिन्ही अल्पवयीन मुलींना लॉजवर नेलं. त्यानंतर तिघांनी तीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिन्ही तरुणांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेतिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आटपाडी पोलीस या प्रकरणाची अधिक  चौकशी करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींशी आधी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत तीन तरुणांनी ओळख वाढवली. त्यानंतर याच मुलींना या तीन तरुणांनी फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडली आहे. तीन तरुणांच्या या कृत्याचा प्रकार समोर आल्यानंतर  पीडित मुलींनी आपल्या कुटुंबासोबत आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर  संशयित पांडुरंग हनुमंत यमगर, सुभाष यमगर (दोघे रा. बनपुरी, ता. आटपाडी), किरण बाळासाहेब शेंडगे (रा. शेंडगेवाडी, ता. आटपाडी) या युवकांविरूद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत  आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आटपाडी पोलिसांनी तिघांनाही तात्काळ अटक केली आहे. संशयित पांडुरंग यमगर, सुभाष यमगर, किरण शेंडगे यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत.

दरम्यान या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते. या तीन मुलींशी या तरुणांनी आधी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत ओळख वाढवत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: sexually assaulted three girls by taking them to a lodge asking them to go for a walk

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here