Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! भावानेच केला भावाचा खून

अहमदनगर ब्रेकिंग! भावानेच केला भावाचा खून

Breaking News | Ahmednagar: २८ वर्षीय युवकाचा त्याच्याच भावाने लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या आईलादेखील लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले.

Brother killed brother

कर्जत :तालुक्यातील हिंगणगाव येथील येथे २८ वर्षीय युवकाचा त्याच्याच भावाने लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या आईलादेखील लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले आहे. त्यांना उपचारासाठी नगर येथे रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. मिथुन ऊर्फ नितीन विकास काळे (वय २८) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी : हिंगणगाव गावाच्या शिवारातील भोसले वस्ती येथे अशोक गायकवाड

यांच्या शेतातील गट नंबर ३८मधील पडीक जमिनीवर गणेश विकास काळे व नितीन विकास काळे हे पाल टाकून राहत होते. गुरुवारी (दि. ४) रात्री दहा वाजता गणेश काळे हा नितीन ऊर्फ मिथुन काळे यास म्हणाला की, मी कामावर गेल्यावर मुलाला मारहाण करता. त्याच्यासोबत सतत भांडणे करतात. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला जाऊन नितीन व गणेश यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली. या वेळी लाकडी दांडक्याने गणेश काळे याने नितीन ऊर्फ मिथुन यास डोक्यात जोराने प्रहार केला. या मारहाणीमध्ये नितीन काळे हा मृत पावला. या वेळी आई रिबीना

विकास काळे हिलाही गणेश काळे याने काठीने जबर मारहाण करून जखमी केले. त्यांना नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. याबाबत माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक मुळक यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी कोहिनूर साहेबराव भोसले (रा. परीटवाडी, ता. कर्जत) याच्या फिर्यादीवरून गणेश काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Brother killed brother

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here