भाऊबीजेची बहिणीला अनोखी भेट देण्याचे काम विवेकानंद प्रतिष्ठान व आधार फौंडेशन
भाऊबीजेची बहिणीला अनोखी भेट देण्याचे काम विवेकानंद प्रतिष्ठान व आधार फौंडेशन
आधीच निराधार, त्यात घरही जळाले, त्यामुळं संपुर्ण उघड्यावर पडलेला प्रपंच त्यात दिवाळीचा सण, तो प्रपंच उभारून भाऊबीजेची बहिणीला अनोखी भेट देण्याचे काम सावरगाव तळ च्या विवेकानंद प्रतिष्टान व आधार फाउंडेशन केले.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथेली अलका पोपट भालेराव हि निराधार विधवा महिला आपल्या दोन मुलांसह राहते. तिला दुसरा कोणताही आधार नसल्याने ती आपल्या दोन्हीही मुलांसह रोजंदारीच्या कामावर जाऊन आपला चरित्रार्थ चालवते. सहा दिवसापूर्वी ती मुलांसह रोजंदारीच्या कामावर गेलेली असतांना घराला अचानक आग लागली. शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला . परंतु या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या न निराधार महिलेला आकस्मित घडलेल्या या घटनेचा मोठा धक्का बसला. ऐन दिवाळीच्या सणासुदीला असे विपरीत घटनेतून विझलेली चूल पुन्हा कशी पेटवायची, दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेने हि महिला पुरती खचली होती. गावचे पोलीस पाटील गोरक्ष नेहे यांनी सरकारी पंचनामा केला परंतु शासकीय मदत तुटपुंजी असते शिवाय ती केव्हा मिळेल किंवा नाही याची वाट न पाहता या निराधार महिलेची विझलेली चूल पुन्हा कशी पेटेल व ही भगिनी पुन्हा कशी ताकतीने उभी राहील व आपली दिवाळी इतर गावकऱ्यांसारखी कशी आनंदाने साजरी करेल यासाठी गावातील विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठान व संगमनेर येथील आधार फौंडेशन च्या युवकांनी मदतीचा हात दिला. प्रथम तिच्या घराला रंग रंगोटी करून तिचे दुःख दूर करण्याचा चंग बांधला तिला धान्य, भांडे, किराणा साहित्य अंथरणे, पांघरणेचे कपडे, साड्या, मुलांना कपडे , दिपावली चे फराळ दिले. तिच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रयत्न करून तिला भाऊबीजेची अनोखी भेट देऊन या निराधार महिलेची दिपावली गोड केली आहे .
यासाठी विवेकानंद प्रतिष्ठान चे डॉ शंकर गाडे, पोलिस पाटील गोरक्ष नेहे, काशिनाथ थिटमे, राजेंद्र गाडे, साहेबराव नेहे, प्रल्हाद नेहे, प्रकाश वाघमारे, संजय गाडे, जिजाभाऊ नेहे, कैलास वाघमारे, जगदीश फापाळे, धनंजय नेहे, चांगदेव नेहे,नवनाथ नेहे, संदीप फापाळे, संकेत नेहे, रमेश नेहे, नवनाथ गाडे, भारत कानवडे, बबन गाडे, बाळासाहेब थिटमे, बाळासाहेब कानवडे आधार फाऊंडेशनचे सुखदेव ईल्हे, डॉ महादेव अरगडे ,अनिल कडलग, तान्हाजी आंधळे, पी डी सोनवणे यांनी अनमोल मदत केली आहे.
Website Title: Brother’s brother’s unique gift adhaar foundation
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.
प्रमोटेड बातम्या: