Home अकोले सर्वांसाठी दिलासादायक असा अर्थसंकल्प: मधुकरराव पिचड

सर्वांसाठी दिलासादायक असा अर्थसंकल्प: मधुकरराव पिचड

अकोले (Budget 2020):- शेतकरी, नोकरदार, सामान्य जनता या सर्वांना समोर ठेवून अर्थसंकल्प सादर झाला असून नविन शैक्षणिक धोरण, आरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजना, महिला बचत सक्षमीकरण असे अनेक चांगले उपाययोजना अर्थसंकल्पात असून सर्वांसाठी असा अर्थसंकल्प आहे. भाजपच्या वतीने याचे स्वागत करण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रीय अर्थसंकल्पात मनुष्य जीवन सुखमय करण्यासाठी कृषी, सिंचन व ग्रामीण विकास या तीन बाबीवर भर दिला असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण जनतेसाठी अतिशय दिलासादायक अर्थसंकल्प असल्याचे मत केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सामान्य जनता व शेतकरी यांना डोक्यासमोर ठेवले आहे. शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम जाहिर केला असून सेंद्रिय शेतीवर भर, सौरपंप, शेतीत गुंतवणूक, जैविक शेती, झिरो बजेट शेती, किसान रेल ची योजना केली आहे.

पी एम कुसुम योजनेअंतर्गत २० लाख शेतकऱ्यांना पीक जमिनीवर सोलर उपकरणे दिले जाणार आहे. १५ लाख शेतकऱ्यांना कृषी सौरपंप दिले जाणार आहे.

व्यापारी पिकासाठी एक जिल्हा एक पिक योजना राबविणार असून दूध उत्पादन दुप्पटीने वाढवून १०८ दशलक्ष मेट्रीक टन करण्यात येणार आहे. तर मत्सपालनसाठी ही सागरमित्र योजना राबविली जाणार आहे. महिलांसाठी धान्य लक्ष्मी योजना राबविली जाणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतुद केली असून या योजनेमधून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला दिले जातात याचा लाभ आठ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. महिला बचत गटांना उभारणी करण्यासाठी नाबार्ड योजनेतून कर्जपुरवठा होणार असल्याने महिला सक्षमीकरण होईल.

आयुष्यमान भारत योजनेचा लाभार्थ्यांसाठी २०हजार रुग्णालये होणार असल्याने सामान्य जनतेस आरोग्याच्या दृष्टीने फायदयाचे होणार आहे.

पाच लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय नोकरदारांना दिलासादायक आहे.

या अर्थसंकल्पाचे अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड, भाजपा जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्वागत केले आहे.


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: Budget 2020 Madhukar Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here