Home अहमदनगर संगमनेर: सराफाला लुटणारी टोळी जेरबंद, १४ लाखांचा ऐवज हस्तगत

संगमनेर: सराफाला लुटणारी टोळी जेरबंद, १४ लाखांचा ऐवज हस्तगत

Sangamner: सराफाच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून ७ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना. चोरट्यांच्या टोळीला जेरबंद (Arrested) करण्यात गुन्हे शाखेला यश. (Ahmednagar News)

Bullion looting gang arrested 14 lakhs recovered

अहमदनगर | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथे एका सराफाच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून ७ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना घडली होती. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच चारचाकी वळवून भरधाव वेगाने अहमदनगरच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संगमनेर येथील सराफाला लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर रोडवरील सुरेशनगर फाटा येथून अटक केली. आरोपींकडून ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने, गावठी कट्टा, चारचाकी, असा एकूण १४ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

खंडेश्वर रमेश ठोंबळ (२३, रा. आंत्रे, शहरटाकळी, ता. शेवगाव), आकाश बाळासाहेब चौधरी (२३, रा. रांजणगाव, ता. शेवगाव), प्रमोद रावसाहेब गायकवाड ( ३३, रा. मुसळेवस्ती, लोणी, ता. राहाता) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, मनोहर शेजवळ, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, विशाल दळवी, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे आदींच्या पथकाने केली.

याबाबत अधिक माहिती अशी सराफ व्यावसायिक प्रसाद पंडितराव नांदुरकर (रा. निमगावजाळी, ता. संगमनेर ) सोमवारी (दि. २६) दुकानातील सोने व चांदीचे दागिने पिशवीत भरून घरी निघाले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून ७ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाले. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गन्हे शाखेला दिला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी, नेवासा परिसरात आरोपींचा शोध घेत असताना आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी नेवासा फाटा येथे येणार आहेत, अशी माहिती गुप्त बातमीदारामाफत मिळाली पोलिसांना मिळाली. पथकाने नेवासा फाटा सापळा लावला असता पांढऱ्या रंगाची चारचाकी येताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने न थांबता चारचाकी अहमदनगरच्या दिशेने वळविली व भरधाव वेगाने निघाला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत पुढे येऊन चारचाकी रस्त्यात आडवी उभी करून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना नेवासा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे ८ लाख ५० हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने, ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, १५०० रुपयांची दोन जिवंत काडतुसे, ५ लाख रुपये किमतीची चारचाकी, ४५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, असा एकूण १४ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

Web Title: Bullion looting gang arrested 14 lakhs recovered

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here