Home अहमदनगर दोन तरुणांनी तरुणीचे अपहरण केले अन….

दोन तरुणांनी तरुणीचे अपहरण केले अन….

Ahmednagar News: एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे दोन तरुणांनी अपहरण (Kidnap) केल्याची घटना.

Two young men kidnap the young woman

राहुरी : तांभेरे परिसरात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे दोन तरुणांनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे.  सिनेस्टाईलने तरुणीला पळवून नेले अन  तरुणीच्या नातेवाइकांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु, तरुणांनी मोटारसायकल सुसाट चालवून तरुणीला पळवून नेले. सदर घटना दि. २५ जून रोजी घडली.

या घटनेतील अल्पवयीन तरुणी सकाळी ९.३०च्या दरम्यान घराजवळ चौकात उभी होती. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी तरुणीला मोटारसायकवर बसवून पळवून नेले. तरुणीच्या वडिलांनी व इतर नातेवाइकांनी त्यांचा पाठलाग केला. पण ते भरधाव निघून गेले. दुपारी तरुणीचे वडील तक्रार देण्यासाठी राहुरी पोलिस ठाण्यात गेले. तेव्हा एका नातेवाइकाने त्यांना फोन करून तुमची मुलगी निर्मळ पिंपरी बायपास चौकात आरोपी गौरव विश्वनाथ लबडे (रा. शिंदे वस्ती, कोल्हार बु) व अमोल संतोष बेलकर (रा. बेलकर वस्ती तांभेरे) यांच्या मोटारसायकलवर जाताना पाहिल्याचे सांगितले. वडील निर्मळ पिंपरी येथे गेले असता दोन तरुणांसह ती तरुणी सापडली.

लोणी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणीला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तिच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी गौरव लबडे, अमोल संतोष बेलकर या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीना पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Two young men kidnap the young woman

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here