Home संगमनेर संगमनेरात घरफोडी, २ लाख ३५ हजारांचे दागिने लांबविले

संगमनेरात घरफोडी, २ लाख ३५ हजारांचे दागिने लांबविले

Breaking News | Sangamner:  घराचे कुलूप तोडून लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लांबविल्याची घटना.

Burglary in Sangamner jewelry worth 2 lakh 35 thousand stolen

संगमनेर: अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लांबविल्याची घटना शहरातील कुरण रोड परिसरात घडली आहे. शहरातील कुरण रोड परिसरात राहणाऱ्या समरिन साजिद पठाण यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने लॉकर मधून दागिन्यांची चोरी केली.

चोरट्याने ४२ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम २०० मि. ली वजनाचा सोन्याचा नेकलेस, ९,५०० रुपये किमतीचे २ ग्रॅम ५८० मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, ३८ हजार रुपये किमतीचे १९ ग्रॅम ९०० मिली वजनाचे सोन्याचे कानातले जोड, ३९ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचा सोन्याची साखळी १२०० रुपये किमतीचे २८० मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, ३७५० रुपये किमतीचे २ ग्रॅम २५० मिली वजनाचे सोन्याची अंगठी, १२७० रुपये किमतीचे ५६० मिली वजनाचे सोन्याचे कानातले जोड, १२७० रुपये किमतीचे ५६० मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, १३२६ रुपये किमतीचे ८६० मिली वजनाचे सोन्याचे १६ मणी, ११९१ रुपये किमतीचे ४९० मिली वजनाचे सोन्याचे २४ मणी, ७२ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम ७९० मिली वजनाचे सोन्याचे गंठण, १२ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम २३० मिली वजनाचे सोन्याचे पेंडल, ३२५ रुपये किमतीचे ५ ग्रॅम २८० मिली वजनाचे चांदीची आंगठी, ६२० रुपये किमतीचे ९३० मिली व २५ मिली वजनाचे चांदीची पैंजण, ८९० रुपये किमतीचे १५ ग्रॅम व ५५० मिली वजनाचे चांदीचे कडे, ९२० रुपये किमतीचे १७ ग्रॅम वजनाचे चांदीची चेन, १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख ३५ हजार २६२ रुपयांचे दागिने चोरून नेले.

याबाबत समरिन पठाण या महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ४/२०२४ भारतीय दंड संहिता ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक एल. आर. जाधव हे करत आहे.

Web Title: Burglary in Sangamner jewelry worth 2 lakh 35 thousand stolen

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here