अहमदनगर ब्रेकिंग: स्कुल बस अपघातात तरुणी शिक्षिकेचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: कनिष्ठ महाविद्यालयाच्या बसचा अपघात झाला. यात याच महाविद्यालयाची शिक्षिका यांचा जागीच मृत्यू.
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बसचा गुरुवारी दुपारी एक वाजता अपघात झाला. यात याच महाविद्यालयाची शिक्षिका अश्विनी भिकाहरी रहाणे (वय-२४) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जवळके- वावी रस्त्यावर बहादरपूर शिवारात घडली आहे.
जवळके येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची बस (क्रमांक एम.एच- १७ बीवाय – १८३२) महाविद्यालय सुटल्यावर शालेय विद्यार्थी घेऊन बहादरपूर, देवकौठे, रांजणगाव देशमुख, मनेगाव, काकडी अशी चालली होती. महाविद्यालयापासून अवघे दोन किलोमिटर आल्यावर बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरली व रस्त्यालगत खोल असलेल्या साईडगटारात गेली. यावेळी बसमधील शिक्षिका अश्विनी भिकाहरी रहाणे या बसच्या बाहेर फेकल्या जाऊन मागील चाकाखाली गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने परिसरातील नागरिकांनी शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. इतर विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अश्विनी रहाणे गेल्या काही दिवसांपासून या महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत होत्या. त्यांच्यावर सायंकाळी बहादरपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बस चालकाबाबत सातत्याने विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या होत्या. तशी कल्पना आम्ही संबंधितांना दिल्या होत्या. बसमध्ये घटना घडली तेव्हा सुमारे पन्नास मुले-मुली होत्या. या घटनेने मुले हादरली आहेत.
Web Title: Teacher dies in school bus accident
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News