भाजप माजी आमदाराच्या बंगल्याच्या पाठीमागे अर्धवट पुरलेला मृतदेह आढळला
Crime News: भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागील परिसरात एका व्यक्तीचा अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह (Dead body Found) आढळून आला, परिसरात आणि राजकीय वतृळात एकच खळबळ उडाली.
सातारा: साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागील परिसरात एका व्यक्तीचा अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात आणि राजकीय वतृळात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील वाडे गावात भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांचा हा बंगला आहे. हा बंगला गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. येथे कोणीही राहत नाही. शुक्रवारी दुपारी एक व्यक्ती बंगल्याची साफसफाई करण्यासाठी आला होता. त्यावेळी कुजलेला वास येत असल्याने त्याने बंगल्याच्या मागच्या बाजूस पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आर्धा जमिनीत पुरण्यात आला होता.
गावात अशी भयावह घटना घडल्यानंतर गावकऱ्यांनी तेथे गर्दी केली होती. याबाबत गावात चर्चेला उधान आलं आहे. मृतदेह चिखलात माखलेला होता त्यामुळे तो पुरुषाचा आहे की महिलेचा हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा गावकऱ्यांनी मृतदेह पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सर्वांना बाजूला करत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तसेच रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे एक पथक बंगल्याच्या परिसरात शोध काम करत होते.
कांताताई नलावडे या भाजपच्या माजी आमदार आहेत. गुरुवारी त्यांच्या आयुष्यात दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. त्यांचे पती जयसिंग नलावडे यांचे निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राण ज्योत मावळली. जयसिंग नलावडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक होते. नुकतेच पतीचे निधन झालेले असताना कांताताई या दु:खात आहेत. अशात त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूस असा प्रकार उघडकीस आल्याने त्यांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे.
Web Title: buried Dead body was found behind the bungalow of former BJP MLA
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App