Home अहमदनगर अहमदनगर: नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर: नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ

Ahmednagar News: नदी पात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह (Dead body), डोक्याला गंभीर जखम व नदीपात्रात गोणीत आढळलेला हा मृतदेह असल्याने हा घातपाताचाच प्रकार असू शकतो असा संशय.

Dead Body were found floating in the riverbed

कोपरगाव | Kopargaon:  कोपरगाव तालुक्यातील जांभूळ नाला नदी पात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना आज रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

३५ ते ४० वर्षे वयोगटातील ही पुरुष जातीची व्यक्ती असून सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील दाखल झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  हा मृतदेह नदी पात्रात तरंगत असताना काही नागरिकांना आढळून आला त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला माहिती कळवली. सदर इसमाच्या डोक्याला गंभीर जखम व नदीपात्रात गोणीत आढळलेला हा मृतदेह असल्याने हा घातपाताचाच प्रकार असू शकतो असा संशय बळावला आहे. घटनास्थळी पोहेगावचे सरपंच अमोल औताडे हे दाखल झाले असून पुढील कारवाई शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे.

Web Title: Dead Body were found floating in the riverbed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here