Home संगमनेर संगमनेरातील शिवसैनिकांकडून राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेचे दहन

संगमनेरातील शिवसैनिकांकडून राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेचे दहन

Breaking News | Sangamner: खरी शिवसेना कोणाची व १६ आमदार अपात्रता संदर्भात निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे.

Burning effigy of Rahul Narvekar by Shiv Sainiks

संगमनेर : खरी शिवसेना कोणाची व १६ आमदार अपात्रता संदर्भात निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे.  विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विरोधात निकाल दिल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नार्वेकर यांच्या प्रतिमेचे दहन केले. संगमनेर बस स्थानक परिसरात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन करून नार्वेकर यांचा निषेध केला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नार्वेकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी १६ आमदार अपात्र ठरण्याबाबतची याचिका फेटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरे शिवसेना असल्याचा निकाल या निकालाची माहिती समजतात संतप्त झालेले शिवसैनिक संगमनेर बस स्थानक परिसरात एकत्र झाले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय फड व कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जोडे मारो आंदोलन केल्यानंतर नार्वेकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. काल सायंकाळी हा निषेध करण्यात आला आहे. 

याप्रसंगी माजी नगरसेवक किशोर पवार, दिव्यांग सहाय्यक सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, समीर ओझा, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते, योगेश बिचकर, विलास भोंडवे, अमोल मस्के, अमोल कवडे, शैलेश सूर्यवंशी, अजित मोमीन, भैया तांबोळी, तात्यासाहेब गुंजाळ, अमित चव्हाण, निलेश रहाणे, सलमान शेख, नारायण पवार, बाळू घोडके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Burning effigy of Rahul Narvekar by Shiv Sainiks

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here