Home क्राईम आई रुग्णालयात,जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आई रुग्णालयात,जन्मदात्या बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Breaking Crime News: मद्यपी बापाने चार दिवस सलग स्वत:च्या मुलीचे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

mother hospital, minor girl was abused by birth father

वर्धा: वर्धा जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मद्यपी बापाने चार दिवस सलग स्वत:च्या मुलीचे लैंगिक शोषण (sexual abused) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मोठं धाडस करत मुलीने शेजारच्या काकूला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी बापाला पकडून पोलीस ठाण्याला नेले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १७ वर्षीय पीडितेचे आई आजारी असल्याने तिला १ जानेवारीला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे तिच्याजवळ तिचा १२ वर्षीय मुलगा राहत होता. तर पीडिता मुलगी ही घरी वडिलांसोबत राहत होती.

बाप दररोज मद्य पिऊन तिच्यावर बळजबरी अत्याचार करीत असे.. दिवस-रात्र पीडिता आरोपीच्या वासनेची शिकार ठरली. अखेर पीडितने हा सर्व प्रकार शेजारच्या काकूंना सांगितला. मात्र, पीडितेच्या सांगण्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता.

अखेर शेजारच्या काकूने पाळत ठेवली आणि वडील पुन्हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्यानंतर पीडितेवर अत्याचार करू लागला. तेवढ्यातच शेजारच्या काकूने गावातीलच नागरिकांना सोबत घेऊन आरोपी बापाला पकडून चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी आरोपी वडिलांवर  गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या निर्देशात ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विष्णू भांडवले यांनी केली.

Web Title: mother hospital, minor girl was abused by birth father

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here