Home क्राईम मित्रांकडून मित्राची गोळी झाडून हत्या, दोघा जणांना अटक

मित्रांकडून मित्राची गोळी झाडून हत्या, दोघा जणांना अटक

Breaking Crime News: एका मित्राला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून हत्या (Murder) केल्याची घटना.

Friend shot dead by friends, two arrested

कल्याण: टिटवाळा परिसरातील म्हारळ गाव हद्दीतील खदानीत मंगळवारी रात्री दारू पित असताना चार मित्रांनी आपल्या एका मित्राला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  मारेकऱ्यांपैकी दोन जणांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे. दोन जण फरार आहेत. दोन आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. दोन जणांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजन शाम येरकर उर्फ जानू असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो म्हारळ गावातील सूर्यानगर भागात राहत होता. मंगळवारी रात्री मयत राजन आणि त्याचे चार मित्र रोहित भालेकर, परवेझ शेख, सुनील वाघमारे, समीर चव्हाण म्हारळ गावा जवळील दगड खदानीत दारू पित बसले होते. दारू पित असताना राजन आणि इतर चार यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. भांडण वाढत गेले. इतर मित्रांनी एकत्र येऊन राजनला बेदम मारहाण केली.

परवेझ जवळील रिव्हॉल्वर घेऊन रोहितने दोन गोळ्या हवेत झाडल्या. तिसरी गोळी राजनच्या डोक्यात शिरली. तो जागीच मृत्यू झाला. ही माहिती राजनच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी राजनला उल्हासनगरच्या सेंट्रल रूग्णालयात नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भालेकर, वाघमारे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरूद्ध कल्याण रेल्वे पोलीस, कोळसेवाडी, विष्णुनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दोन जण अटकेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे तपास करत आहेत. दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Friend shot dead by friends, two arrested

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here