Home महाराष्ट्र तो वाढदिवस ठरला अखेरचा, बॉयफ्रेण्डसोबत लॉजवर गेली अन…

तो वाढदिवस ठरला अखेरचा, बॉयफ्रेण्डसोबत लॉजवर गेली अन…

Breaking Crime News: जन्मदिवस साजरा करण्यासाठी लॉजवर आलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना.

young man who came to the lodge to celebrate his birthday murder his girlfriend

नवी मुंबई: क्षुल्लक कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. प्रेम प्रकरण, त्यात वाद आणि मग त्या रागात एखाद्याचा जीव घ्यायचा अशा घटनांत वाढ होत आहे.  अशीच एक घटना नवी मुंबई परिसरात घडली आहे. जिथे वाढदिवस एका मुलीसाठी तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरला आहे.  अमित कौर ही तिच्या प्रियकरासोबत लॉजवर वाढदिवस साजरा करायला आली आणि जन्मदिनीच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तिचा प्रियकरच तिचा काळ बनेल.

जन्मदिवस साजरा करण्यासाठी लॉजवर आलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई शहरात घडली आहे. हत्येनंतर प्रियकर पळून जात असताना तो साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी लॉजवर जाऊन पाहणी केली असता हत्येच्या गुन्हा उघडकीस आला आहे.

खैरणे एमआयडीसीमधील अश्विन लॉजमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी सोहेब कलाम शेख (वय २४ वर्षे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो साकीनाक्याचा राहणारा असून, अमितकौर रणधीर सिंग वीग (वय ३५ वर्षे) नावाच्या महिलेसोबत लॉजवर आला होता. अमित कौरचा वाढदिवस होता. दोघेही अश्विन लॉजवर आले होते. त्यानुसार, रात्री दोघांनी एकत्र केकदेखील कापला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि सोहेब याने गळा आवळून अमित कौरची हत्या केली, तर मृतदेह त्याच खोलीत ठेऊन रात्रीच्या वेळी त्याने लॉजमधून पळ काढला. दरम्यान, लॉजमधील कामगारांना त्याची कसलीही कल्पना नव्हती.

घटस्फोटित असलेली अमित कौर ही एका बँकेत मॅनेजर म्हणून कामाला होती. हे दोघेही खैरणे एमआयडीसीतील अश्वीनी लॉजिंगमध्ये गेले होते. यादरम्यान सोहेबने अमितची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर घाबरलेल्या सोहेबने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या मित्राला दिल्यानंतर याची कुणकुण पोलिसांच्या खबऱ्याला लागली. खबऱ्याच्या माहितीच्या आधारे साकीनाका पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे आणि त्यांच्या पथकाने परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सोहेब शेख याला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास साकीनाका जंक्शन येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अद्याप हत्येचे कारण समोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: young man who came to the lodge to celebrate his birthday murder his girlfriend

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here