Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या करून जाळण्यात…..

संगमनेर तालुक्यात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या करून जाळण्यात…..

Sangamner News: साकुर पठार भागातील जांभूळवाडी शिवारात वनविभागाच्या हद्दीत लळईच्या घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करून जाळण्यात आल्याचा पोलिसांचा संशय.

A burnt body was found in Sangamner taluk, causing excitement, killing 

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर (Sakur) पठार भागातील जांभूळवाडी शिवारात वनविभागाच्या हद्दीत लळईच्या घाटात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. १६) दुपारी एकच्या सुमारास समोर आली. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील बाळासाहेब विघे हे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. बांधाशेजारी वनविभागाच्या हद्दीत त्यांना अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. विधेंनी पोलिस पाटील साहेबराव बारवे यांना कळविले. बारवे यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करत घारगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांसह कर्मचा-यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविला.

मृतदेह ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. हत्या करून त्याला जाळण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला, याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A burnt body was found in Sangamner taluk, causing excitement, killing 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here