Home अहमदनगर Accident: एसटी बस व  दुचाकी अपघातात तरुण ठार

Accident: एसटी बस व  दुचाकी अपघातात तरुण ठार

Bus and bike Accident one death

अहमदनगर | Accident: नगर औरंगाबाद महामार्गालगत इमामपूर परिसरात एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

गोरक्षनाथ दत्तात्रय लवांडे वय २६ रा. बहिरवाडी ता. नगर असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. इमामपूर येथील बहिरोबा मळा येथून वाकी वस्तीकडे जात असताना औरंगाबादकडून नगरकडे येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. बजाज डिस्कवर दुचाकी व बोदवड पुणे बसचा यांच्यात अपघात झाला.

या अपघातात जखमी झालेल्या तरुणास जेऊर येथील रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने व केडगाव येथील रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तरुणाचा बळी गेला असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. 

Web Title: Bus and bike Accident one death  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here