Home अकोले अकोले: बस उलटण्यापासून थोडक्यात बचावली, ४५ विद्यार्थी सुखरूप

अकोले: बस उलटण्यापासून थोडक्यात बचावली, ४५ विद्यार्थी सुखरूप

Akole News: खोदकाम, अपूर्ण व अरुंद रस्त्यामुळे पर्यटकांना नेहमीच मनस्ताप.

Bus narrowly escapes overturning, 45 students unharmed

अकोले: शनिवार-रविवारची सुट्टी पाहून भंडारदरा परिसरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ठाणे येथून आलेली बस अरुंद व अपूर्ण रस्त्यामुळे रस्त्याच्या खाली उतरली, सुदैवाने ती उलटण्यापासून थोडक्यात बचावली, त्यामुळे 45 विद्यार्थी बचावले. खोदकाम, अपूर्ण व अरुंद रस्त्यामुळे पर्यटकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ या रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने एका बाजुला रस्त्याचे काँक्रीटीकरण केले असून दुसरी बाजू खोदून ठेवली आहे. भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत असल्याने सर्वचे सर्व पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत. पर्यटकांकडे स्वतःचे वाहन असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी कायमस्वरुपी होत आहे. रस्ता एका बाजुने सुरू आहे.

दुसर्‍या बाजुने खोदलेल्या रस्त्यामध्ये मोठे चारचाकी वाहन बसत नसल्याने वाहनाच्या टायरचे मोठे नुकसान होत आहे. काही पर्यटक काँक्रिटच्या रस्त्यावरून दोन्ही बाजुने वाहने नेतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे.. शेंडी येथेही भरचौकात एका बाजुला रस्ता अपूर्ण ठेवल्याने याही ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांना माहिती समजतात ते घटनास्थळी हजर झाले. पो. कॉ. अशोक गाडे व त्यांचे सहकारी यांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यास मदत केली. ठेकेदाराने हा रस्ता खोदताना पावसाळा तसेच पर्यटनात होणारी गर्दी लक्षात घेता काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

Web Title: Bus narrowly escapes overturning, 45 students unharmed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here