Home अहमदनगर अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमध्ये आढळला पाच लाखांचा गुटखा

अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमध्ये आढळला पाच लाखांचा गुटखा

Ahmednagar News: मालवाहू वाहनात पाच लाख दहा हजार रुपयांचा गुटखा पाथर्डी पोलिसांनी पकडल्याची घटना.

Gutkha worth five lakhs was found in the accident cargo truck

पाथर्डी : अपघात झालेल्या मालवाहू वाहनात पाच लाख दहा हजार रुपयांचा गुटखा पाथर्डी पोलिसांनी पकडल्याची घटना तालुक्यातील ढवळेवाडी शिवारात शुक्रवारी (दि. ४) रात्री अकराच्या सुमारास घडली.

ढवळेवाडी शिवारातून शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास दत्तू नामदेव खेडकर हा एमएच १७ एजी ९२२४ या चारचाकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून गुटख्याची वाहतूक करत होता. त्याचे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्ड्यात गेले. अपघात झाल्याचे समजताच परिसरात राहत असलेले नागरिक तेथे जमा झाले. खेडकर याला कोणताही मार लागलेला नव्हता. नागरिकांनी वाहनात काय आहे, याची तपासणी केली. त्यामध्ये बंदी घातलेला गुटखा असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. नंतर पोलिस पथक त्या ठिकाणी गेले.

तपासणी केली असता पोलिसांना ट्रक मध्ये सुगंधी तंबाखूच्या गोण्या आढळून आल्या. यामध्ये चार लाख वीस हजार रुपये किमतीच्या हिरा कंपनीच्या दहा गोण्या सुगंधी सुपारी, 90 हजार रुपये किमतीची हिरा कंपनीची सुगंधी तंबाखू, व तीन लाख रुपये किमतीचा मालवाहू ट्रक असा आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र रामदास बडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुटखाबंदी कायद्यानुसार भादवी 328,188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मालवाहू ट्रक मधील गुटखा कुठून आला व कुठे जाणार होता याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास गुटखा माफीयांचे पाळेमुळे उघडकीस येणार आहेत.

Web Title: Gutkha worth five lakhs was found in the accident cargo truck

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here