Home अहमदनगर अहमदनगर: सीए महिलेचा भर रस्त्यात विनयभंग

अहमदनगर: सीए महिलेचा भर रस्त्यात विनयभंग

Ahmednagar News: खासगी बँकेत सीए म्हणून कामकाज करणार्‍या महिलेची भरदुपारी रस्त्यात छेड, लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून जीवे मारण्याची धमकी, विनयभंगाचा (molested) गुन्हा दाखल.

CA woman molested on the road

अहमदनगर: येथील खासगी बँकेत सीए म्हणून कामकाज करणार्‍या महिलेची भरदुपारी रस्त्यात छेड काढण्यात आली. मध्ये आलेल्या तिच्या पतीला मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी (दिनांक 12 एप्रिल) दुपारी सव्वा दोन वाजता नगर शहरात घडली.

पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुकूंद शांताराम देवगावकर (रा. महाजन गल्ली, गांधी मैदानाजवळ) या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या कामानिमित्त बुधवारी दुपारी घराच्या बाहेर पडल्या होत्या. त्या रस्त्याने पायी जात असताना मुकूंद देवगावकरने त्यांना आवाज दिला व तुझे घर उध्दवस्त करतो म्हणत शिवीगाळ केले.

फिर्यादीने जाब विचारला असता त्याने आणखी शिवीगाळ केली. फिर्यादीने त्यांच्या पतीला तेथे बोलून घेतले. ते आले असता त्यांना देखील देवगावकर याने शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: CA woman molested on the road

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here