Home Suicide News  ‘लेस्बियन’ पार्टनर आणि मैत्रिणीच्या दबावामुळे आत्महत्या, दोन मुलींवर गुन्हा

 ‘लेस्बियन’ पार्टनर आणि मैत्रिणीच्या दबावामुळे आत्महत्या, दोन मुलींवर गुन्हा

Nagpur Crime: लेस्बियन पार्टनर आणि तिच्या मैत्रिणीच्या छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Suicide due to pressure from 'lesbian' partner and girlfriend, crime against two girls

नागपूर : लेस्बियन पार्टनर आणि तिच्या मैत्रिणीच्या छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर महिनाभरानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, सोनेगाव पोलिसांनी मृत विद्यार्थिनीच्या मैत्रिणीसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

२३ वर्षीय अंकिता (नाव बदललेले) तांत्रिक प्रशिक्षण घेत होती. तिची संध्या (२४) ( नाव बदललेले) हिच्याशी वर्षभरापासून मैत्री होती. संध्याच अंकिताला कॉलेजला घेऊन जायची. ६ मार्च रोजी अंकिताने धंतोली पोलिस ठाण्याजवळील नाल्याजवळ विष प्राशन केले असून, तिला हिंगणा येथील रुग्णालयात दाखल केल्याचे संध्याने अंकिताच्या कुटुंबीयांना सांगितले. यात संशय आल्याने कुटुंबीयांनी चौकशी केली असता त्यादिवशी अंकिता आणि संध्यामध्ये वाद झाला होता, असे कळले. या वादानंतरच अंकिताने विष प्राशन केले होते.

अंकिताचा प्रियकर रुग्णालयात पोहोचला. त्याने दि. २६ नोव्हेंबर २०१९ रोजीच अंकितासोबत कोर्ट मॅरेज झाल्याचे सांगितले. नात्याबाबत कुटुंबात मतभेद असल्याने लग्नाची बाब लपविल्याची त्याने माहिती दिली. उपचारादरम्यान दि. ११ मार्च रोजी अंकिताचा मृत्यू झाला.

पोलिसांनी अंकिता आणि संध्या यांचे मोबाइल तपासले. यामध्ये संध्याने अंकितासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले आहे. अंकिताने तिच्या प्रियकरासोबत लग्न केल्याची माहिती संध्याला मिळाली. तिने अंकितावर लग्न आणि प्रेमसंबंध तोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात या घटनेची माहिती मिळताच केली.

दरम्यान संध्याची सरिता (नाव बदललेले) या २० वर्षीय विद्यार्थिनीशी मैत्री आहे. सरिताही अंकितावर दबाव आणायची. सोनेगाव पोलिसांनी अंकिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संध्या आणि सरिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Suicide due to pressure from ‘lesbian’ partner and girlfriend, crime against two girls

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here