Home क्राईम संगमनेर: दोघा भावंडांनी शहरातील पतसंस्थेला बनावट कागदपत्रांच्या आधारे घातला गंडा

संगमनेर: दोघा भावंडांनी शहरातील पतसंस्थेला बनावट कागदपत्रांच्या आधारे घातला गंडा

Sangamner Crime:  मनोली येथील दोघा भावंडांनी शहरातील एका पतसंस्थेच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा परस्पर कमी करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार (scammed). 

two siblings scammed the credit institution in the city on the basis of forged documents

संगमनेर: मनोली येथील दोघा भावंडांनी शहरातील एका पतसंस्थेच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा परस्पर कमी करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहरातील चार मोठ्या बँकांना बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे तब्बल सहा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे आणि कर्जदारांचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस ठाण्यात या संदर्भात श्री. कुलस्वामीनी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमीटेड या पतसंस्थेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक संदीप तानाजी संते (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भास्कर शिंदे व सहकर्जदार संदीप भास्कर शिंदे (दोघे रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघां विरोधात भारतीय दंड विधान कलम ३४, ३७१, ४२०, ४६५ ४६८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संते यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ३० नोव्हेंबर २०१७ रोजी पाचशे रुपये भरून मनोली येथील सुनील भास्कर शिंदे याने बँकेचे सभासदत्व घेतले होते. त्यानंतर १६ एप्रिल २०१८ रोजी त्याने फळ विक्रीच्या व्यवसायासाठी संस्थेकडे २३ लाख रुपयांची कर्ज मागणी केली. त्यासाठी त्याने आवश्यक कागदपत्रांसह तारण म्हणून मनोली येथील गट नंबर ७७/१/१ क्षेत्र ०.८१ आर व देवठाण येथील दीडशे गुंठे अशा जमिनीचे गहाणखत संस्थेला करून दिले होते. त्यासाठी सह कर्जदार संदीप भास्कर शिंदे, जामीनदार विलास शिवदास बेंद्रे, बाबासाहेब रामभाऊ थोरात, कर्जासाठी जंमती देणारी त्यांची पत्नी तृप्ती शिंदे व योगिता शिंदे यांच्या संमतीनंतर १० मे २०१८ रोजी मॉर्गेज झाल्यानंतर मनोली व देवठाण येथील तलाठ्यांना कर्जदारांच्या उताऱ्यावर इतर अधिकारात संस्थेचा बोजा नोंद करण्यासाठी अर्जदाराकडे संस्थेच्या लेटर पॅडवर सही शिक्यासह पत्र देण्यात आले होते.

त्यानंतर अर्जदाराने तलाठ्यास सदर पत्र पोहोच केल्याची पोहोच १८ मे २०१८ रोजी दिल्यानंतर अर्जदाराला वीस लाख रुपयांचा कॅनरा बँकेचा धनादेश देण्यात आला. मात्र इतर हक्कात संस्थेच्या नावाची नोंद होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागत असल्याने फेरफार व बोजा नोंद उतारे दिल्यानंतर अर्जदाराला पुन्हा शहर सहकारी बँकेचा तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. अशा पद्धतीने अर्जदाराने संस्थेकडून २३ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर कर्जदाराने सप्टेंबर २०२० अखेर आरटीजीएस फोन पे व रोख स्वरूपात अशा पद्धतीने ४ लाख १७ हजार रुपये संस्थेकडे भरणा केला होता.

नंतर कर्जदाराचे कर्ज थकल्याने संस्थेकडून त्यांना नोटिस पाठविण्यात आली. त्यानंतर कर्जदार सुनील शिंदे, सहकर्जदार संदीप शिंदे यांच्या विरोधात २४ फेब्रुवारी २०२२ ला उपनिबंधक संस्थेकडे कर्ज वसुली संदर्भात दावा दाखल करण्यात आला असून हा दावा न्यायप्रविष्ठ आहे. दाव्याच्या सुनावणी दरम्यान उपनिबंधक सर्जेराव कांदळकर यांच्यासमोर कर्जदार सहकर्जदाराने मिळकतीवरील बोजा फेर क्रमांक ४६७२ ने कमी केल्याचा फेरफार दिला. त्यामुळे कर्जदाराने संस्थेचे कर्जांना भरता बोजा कसा कमी झाला याबाबत मनोली येथे जात तलाठ्यास संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी विचारणा केले असता त्यांनी कर्जदार सुनील शिंदे सह कर्जदार संदीप शिंदे यांनी ११ फेब्रुवारी २०२० रोजीच्या आमच्या संस्थेने त्यांचे शेत जमिनीवरील श्री कुलस्वामी पतसंस्थेच्या कर्जाच्या बोजाची नोंद दुरुस्ती करण्यासंदर्भात दिलेले पत्र दाखविले. या पत्रावरील सही शिक्का खोटा असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच कर्जदारांनी. कर्ज न भरल्याचे सांगितल्यानंतर तलाठ्याने या शेतजमिनीवरील बोजा पुन्हा कायम केला. मात्र कर्जदारांनी संस्थेचे खोटे कागदपत्र तयार करत बोजा कमी करण्यासाठी त्याचा आधार घेतल्याने या विरोधात संस्थेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: two siblings scammed the credit institution in the city on the basis of forged documents

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here