Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: दुचाकीवरून येऊन केला गोळीबार- Firing

अहमदनगर ब्रेकिंग: दुचाकीवरून येऊन केला गोळीबार- Firing

Nevasa Phata Firing:  दुचाकीवरून आलेल्यांनी हवेत गोळीबार केला. शुक्रवारी सायंकाळी घडली घटना.

came from a bike and opened firing

नेवासा फाटा: नेवासा फाटा वरून सेंट मेरी स्कूल रोडसमोर दुचाकीवरून आलेल्या तीन जणांपैकी एकाने हवेत तीन गोळीबार केले तर दुसऱ्याने उभ्या असलेल्या तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. घटनास्थळावरून दोन ऊडालेल्या गोळ्यांच्या कॅप व एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. त्याठिकाणी तीन ते चार प्रत्यक्षदर्शींचे जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात आले. सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान तीन जण नेवासा फाट्याकडून दुचाकीवर आले.

सेंट मेरी स्कूल समोरील रोडवर आल्यानंतर दुचाकी थांबवत एकाने हवेत तीन गोळीबार केले. तर दुचाकीवरील दुसऱ्याने दुकानासमोर उभ्या असलेल्या एका तरूणाच्या डोक्यात काचेची बाटली मारली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला नेवासाफाटा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिस निरीक्षक विजय करे यांनी परिसरात कुठे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. अधिक तपास सुरु आहे.

Web Title: came from a bike and opened firing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here