Home अकोले निळवंडेतून प्रवरा पात्रात पाणी झेपावले, भंडारदरा व निळवंडे ७० टक्के भरले तर...

निळवंडेतून प्रवरा पात्रात पाणी झेपावले, भंडारदरा व निळवंडे ७० टक्के भरले तर भोजपूर धरण…

Bhandardara | Nilwande | Bhojapur Dam: निळवंडे ७० टक्के भरले असून, ३००० हजार क्यूसेकने प्रवरा पात्रात पाणी झेपावले.

Water was released from Nilwande into Pravara tank, Bhandardara and Nilwande were 70 percent

अकोले: भंडारदरा, निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. यामुळे दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. भंडारदरा पाणलोटातील घाटघर, रतनवाडी येथे ११ इंचाहून अधिक तर भंडारदरा येथे १० इंचाहून अधिक पाऊस कोसळला आणि भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणातील पाणीसाठा शुक्रवारी सायंकाळी ७० टक्के झाला होता. दरम्यान निळवंडे धरणातून आज २ हजार ३०० क्युसेसने पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली. भोजपूर धरण (Bhojapur Dam) हे ८१ टक्के भरले आहे.

आढळा. सांगवी, आंबीत, बलठण, कोथळे, शिरपुंजे, वाकी, टिटवी, पाडोशी, सांगवी व आढळा ही सर्व धरणे ओसंडून वाहत आहे. 

भंडारदरा धरणाच्या पाणलोट लागला आणि १५ दिवसांत भंडारदरा शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ धरणात ४ हजार ९०० दलघफू नवीन पाण्याची आवक झाली.

गेल्या तासात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे: घाटघर २७८, भंडारदरा २५४, रतनवाडी २७६ आणि वाकी २२४ मि.मी.

Web Title: Water was released from Nilwande into Pravara tank, Bhandardara and Nilwande were 70 percent

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here