Home अहमदनगर रोहित्राचा विद्युत प्रवाह जमिनीत उतरून तरुणाचा मृत्यू

रोहित्राचा विद्युत प्रवाह जमिनीत उतरून तरुणाचा मृत्यू

Shevgaon News: ओलसर जमिनीमध्ये वीज उपकेंद्र, बोधेगाव अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू.

electric current landed on the ground and the youth died

शेवगाव: तालुक्यातील दिवटे शिवारातील दिवटे- बोधेगाव रस्त्यालगत असलेल्या गावठाण रोहित्र जवळून जात असताना अचानक विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १३)  सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. शिवदास शंकर कणसे (वय २५, रा. दिवटे, ता. शेवगाव) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

सध्या शेतातील कामे सुरू आहेत. मात्र आठवड्यापासून दिवटे आणि परिसरामध्ये सुरू असलेला संततधार पाऊस बुधवारी सायंकाळच्या दरम्यान काहीसा बंद थांबला होता. त्यावेळी शेतातील पिकाची परिस्थिती पाहण्यासाठी शिवदास कणसे गावालगतच्या रोहित्रापासून चालला होता. त्यावेळी ओलसर जमिनीमध्ये वीज उपकेंद्र, बोधेगाव अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, सोबत असलेल्या शेतकऱ्याने तत्काळ बोधेगाव विद्युत वीज उपकेंद्राला फोन करून माहिती दिली. यावेळी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. नंतर त्याला उपचारासाठी प्रथम बोधेगाव नंतर शेवगाव येथील खासगी एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तपासणी अंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाची मुलगी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

Web Title: electric current landed on the ground and the youth died

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here