संगमनेर तालुक्यातील पठार भागात विहिरीत आढळला मृतदेह
sangamner News: कर्जुले पठार येथे एका विहिरीत ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह (Dead body) आढळून आला.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागात कर्जुले पठार येथे एका विहिरीत ३२ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दशरथ संभाजी पडवळ (वय ३२, रा. कर्जुले पठार), असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस पाटील भाऊसाहेब देवके यांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ हा बुधवारी रात्री घरी आला नव्हता. दरम्यान, गुरुवारी सकाळी गावातील भानुदास पवार यांच्या विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत पोलीस पाटील देवके यांनी घारगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहेत.
Web Title: Dead body was found in a well in the plateau area of Sangamner taluka