Home Accident News Accident: संगमनेर तालुक्यात कार व पिकअपची धडक होत अपघात

Accident: संगमनेर तालुक्यात कार व पिकअपची धडक होत अपघात

Car and pickup Accident in Sangamner taluka

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे दूरक्षेत्रासमोर कार आणि पिकपची धडक होत अपघात घडला. वाहन चालक थोडक्यात बचावले. 

लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोर गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. लोणीहून सिन्नरच्या दिशेने चाललेली पिकप व समोरून येणाऱ्या कारचा पोलीस दूरक्षेत्राजवळ अपघात झाला. या अपघातात दोनही वाहनांमधील चालक बचावले आहेत. मात्र दोनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी दिली. शुक्रवारी सकाळी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेण्यात आली. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली. रस्त्याच्या कमी रुंदीने या रस्त्यावर नेहमीच अपघात घडत असतात. 

Web Title: Car and pickup Accident in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here