Home संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात कार व दुचाकीत अपघात

पुणे नाशिक महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात कार व दुचाकीत अपघात

Car and two-wheeler accident on Pune-Nashik highway Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर गुंजाळवाडी शिवारात कार दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना रविवारी दि, १४ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिजाभाऊ रावसाहेब दराडे व संकेत बाळू गोडे रा. माळेगाव पठार गोडेवाडी हे दोघे जण सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास दुचाकीवरून नाशिक पुणे महामार्गावर संगमनेरच्या दिशेने जात असताना गुंजाळवाडी येथे आले असता त्याचदरम्यान संगमनेरकडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण ढोकरे, संजय मंडलिक, भरत गांजवे, कैलास ठोंबरे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली व दोन जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.  

Web Title: Car and two-wheeler accident on Pune-Nashik highway Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here