Home अहमदनगर उसाच्या शेतात आढळला तरुणीचा मृतदेह

उसाच्या शेतात आढळला तरुणीचा मृतदेह

Nevasa body of a young woman was found in a sugarcane

नेवासा | Nevasa: नेवासा बुद्रुक शिवारात सुरेश बाळासाहेब गारुळे यांच्या उसाच्या शेतात उस तोडणी चालू असताना अंदाजे २० वर्ष वयाच्या तरुणीचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आला.

सदरचे प्रेत हे १५ ते २० दिवसांपूर्वीचे असल्याचे समजते. याबाबत नेवासा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर तरुणीच्या पायामध्ये पैंजण असून त्यावर राजेश्वरी असा मार्क आहे. हातात नारंगी रंगाच्या प्लास्टिक बांगड्या आहेत. नेवासा बु प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी घटनेस्थळी  पोस्टमार्तन केले आहे. या महिलेबाबत कोणाला काही माहित असल्यास नेवासा पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर हे करीत आहे.

Web Title: Nevasa body of a young woman was found in a sugarcane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here