बाळ बोठेच्या खिशात सापडली सूसाईड नोट, ७ दिवसांची पोलीस कोठडी
अहमदनगर: रेखा जरे हत्याकांडमधील मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याच्या खिशात सूसाईड नोट सापडली. बोठे यास शनिवारी पहाटे पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली.
यावेळी पोलिसांना त्याच्या खिशात सूसाईड नोट सापडली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
नगर पोलिसांना अडीच महिन्यानंतर शनिवारी हैद्राबाद येथील बाळ बोठेला अटक करण्यात आली. यावेळी तेथे घेण्यात आलेल्या झडतीमध्ये पोलिसांना सूसाईड नोट आढळून आली. या सूसाईड नोट मध्ये सूसाईड केल्यानंतर माझ्या कुटुंबियांना संपर्क करा असा उल्लेख करण्यात आला.
बाळ बोठे यास शनिवारी अटक करण्यात आली. त्याला पारनेर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. आज बोठे यास न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. गेल्या तीन महिन्यापासून बोठे का फरार होता. त्याला कोणी मदत केली. त्याने रेखा जरे यांची हत्या का केली याचा उलगडा करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील सिद्धार्थ बागले यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Web Title: Suicide note found in Bal Bothe pocket