Home Accident News कारची दुचाकीला धडक; पती-पत्नीसह दोन चिमुकले ठार

कारची दुचाकीला धडक; पती-पत्नीसह दोन चिमुकले ठार

Breaking News | Amravati Accident:  भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीसह दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू.

car collides with a bike Two children were killed along with husband and wife

अमरावती : भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीसह दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवार, २४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुटी-टिटंबा मार्गावर घडली. या प्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली आहे.

दिनेश नंदलाल दारसिंबे (३०), शारदा दिनेश दारसिंबे (२४), युग दिनेश दारसिंबे (७) व युवराज दिनेश दारसिंबे (५) सर्व रा. धोदरा अशी मृतकांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी दिनेश हे पत्नी शारदा, मुले युग व युवराज यांच्यासह होळीचा बाजार करून दुचाकीने गावी जात होते. मार्गात टिटंबावरून शिरपूरकडे जात असलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिनेश, त्यांची पत्नी शारदा यांच्यासह चिमुकले युग व युवराज यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच धारणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहांना शवविच्छेदनासाठी धारणी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले.

Web Title: car collides with a bike Two children were killed along with husband and wife

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here