Home अहमदनगर अहमदनगर: गावठी कट्टा बाळगणारा अटकेत

अहमदनगर: गावठी कट्टा बाळगणारा अटकेत

Breaking News | Ahmednagar: भागात गावठी कट्टा स्वतः जवळ बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक.

Gavathi Katta holder arrested

श्रीरामपूर: शहरातील वॉर्ड नंबर एक मधील हुसेननगर भागात गावठी कट्टा स्वतः जवळ बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे.

दि. २२ मार्च रोजी रात्री पोनि. नितीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नविन तहसील ऑफीस जवळील हुसेननगर कमानीजवळ, वॉर्ड नं. १ येथे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक इसम स्वतःचे कब्जात गावठी कट्टा जवळ बाळगून उभा आहे.

या माहितीच्या आधारे यांनी तात्काळ तपास पथकास सदर ठिकाणी जावुन कारवाई करायचे आदेश दिले. तपास पथक येण्याची चाहुल लागताच सदर इसम पळून जाऊ लागला असता त्यास पथकाने पाठलाग करून पकडले. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने आदम उर्फ भैय्या युसूफ शहा (वय २७, रा. काझीबाबा रोड, वार्ड नं. ०२) असे असल्याचे सांगितले, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३५ हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, दोन हजार रुपये किमतीचे दोन पिवळ्या रंगाचे राउंड असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास दि. २६ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Gavathi Katta holder arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here