Home Accident News शिर्डीला दर्शनासाठी जात असणारी कार पलटी होऊन अपघात, दोघे ठार तर दोघे...

शिर्डीला दर्शनासाठी जात असणारी कार पलटी होऊन अपघात, दोघे ठार तर दोघे गंभीर

Ahmednagar Accident: कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन भीषण अपघात, दोघे ठार, दोघे गंभीर जखमी, नगरमध्ये उपचार सुरु.

Car going to Shirdi for darshan overturned and accident
अहमदनगर: नगर-पुणे महामार्गावर चास घाटातील वळणावर भरधाव वेगातील कार उलटून झालेल्या भीषण अपघातात (Accident) कारमधील दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.15) पहाटे 2 च्या सुमारास घडला.

या अपघातात अजित दीपचंद पटेल (वय 24), विकास रामनारायण विश्‍वकर्मा (वय 21, दोघे रा. जय्यतपूर, मध्यप्रदेश, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे युवक मयत झाले आहेत. तर रामनारायण श्रीबालमुकुंद मेहेरा (वय 26, रा. शिरूर) व मुकेश गोरख पाटील (वय 28, रा. कासौदा, जि. जळगाव, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे जखमी झाले आहेत.

मयत व जखमी हे चौघे एकमेकांचे मित्र असून ते कामानिमित्त कारेगाव व शिरूर येथे राहत होते. मंगळवारी (दि.15) पहाटे ते त्यांचा मित्र आनंदा नाईक (रा. चाकण, ता. खेड) याची मारूती 800 कार (क्र. एम एच 14 ए ई 1103) घेवून कारेगाव येथून शिर्डीकडे दर्शनासाठी चालले होते. पहाटे 2 च्या सुमारास त्यांची कार चास जवळील घाटात आल्यावर वळणावर भरधाव वेगातील कारवरील चालक मयत अजित पटेल याचे नियंत्रण सुटले व कार पलटी झाली. या भीषण अपघातात दोघाजणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Car going to Shirdi for darshan overturned and accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here