Home अहमदनगर Accident: टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात, तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

Accident: टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात, तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

Ahmednagar | karjat Accident:  कांदा विकण्यासाठी सोलापूरला जात असतांना पिकअप वाहनाचा टायर फुटून भीषण अपघात. तीन शेतकऱ्यांचा मृत्यू.

Three farmers died in a tire burst accident 

कर्जत: कांदा विकण्यासाठी सोलापूरला जात असतांना पिकअप वाहनाचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात कर्जत तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.16) पहाटे घडली. हे तिघेही कर्जत तालुक्यातील कोरेगाव  येथील रहिवासी आहेत.

दत्तू भानुदास शेळके (वय 55), श्रीमलसिंग धोंडीसिंग परदेशी (वय 42) व नितीन बजंगे (वय 35) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची  नावे आहेत.

हे तिघेही सोलापुर  येथे कांदा विक्रीसाठी पिकअप वाहनातून जात होते. कर्जत-सोलापूर मार्गावर मोहोळजवळ पिकअप गाडीचा अचानक टायर फुटल्याने भरधाव गाडी पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचाही उपचारांपुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेने कोरेगावावर शोककळा पसरली आहे. तीनही शेतकर्‍यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Three farmers died in a tire burst accident 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here