Home अकोले अकोले: अंबिका माता देवीच्या मंदिरात चोरी, दागिने, मुकुट,रक्कम चोरून पसार

अकोले: अंबिका माता देवीच्या मंदिरात चोरी, दागिने, मुकुट,रक्कम चोरून पसार

Akole Theft:  अंबिका माता देवीच्या बंद मंदिराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील देवीचे दागिने, चांदीचा 3 किलो वजनाचा मुकूट व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना.

Theft jewels, crowns, money in the temple of Ambika Mata Devi

अकोले:  अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील अंबिका माता देवीच्या बंद मंदिराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील देवीचे दागिने, चांदीचा 3 किलो वजनाचा मुकूट व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  निंब्रळ येथील अंबिका माता देवीच्या मंदिरात कुणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून स्वतःच्या फायद्यासाठी मंदिरातील 60 हजार रुपये किमतीचा अंदाजे 3 किलो वजनाचा चांदीचा मुकूट, 10 हजार रुपये किंमतीचे पिवळ्या धातूचे 20 मण्याचे डोरले, दानपेटीतील अंदाजे 1 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी विजय दगडू डावरे (वय 53) रा.निंब्रळ, ता. अकोले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 532/2022 भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाजीराव गवारी करत आहेत.

Web Title: Theft of jewels, crowns, and money in the temple of Ambika Mata Devi

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here