Home क्राईम Raid:  संगमनेरात हुक्का पार्लरवर छापा

Raid:  संगमनेरात हुक्का पार्लरवर छापा

Ahmednagar | Sangamner raid: गुंजाळवाडी शिवारातील हॉटेल ग्रीन लीप शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला विनापरवाना हुक्का पार्लरवर छापा.

Raid on hookah parlor in Sangamner

संगमनेर:  शहराला खेटूनच असणाच्या गुंजाळवाडी शिवारात सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला करण्यात आला आहे. या असून, नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हुक्का पार्लर चालविणाऱ्या संतोष अशोक वांढेकर (रा. लक्ष्मीनगर, गुंजाळवाडी) याच्यासह संकेत नारायण कलंत्री (रा. बाजारपेठ, संगमनेर), गणेश शिवप्रसाद लाहोटी,  श्रेयस  श्रीकांत मणियार (रा. स्वातंत्र्य चौक, गुंजाळवाडी शिवारातील हॉटेल ‘ग्रीन संगमनेर), ऋषी संतोष आव्हाड (रा. शिवाजीनगर, संगमनेर), अनिकेत चंद्रकांत खोजे (रा. गणेशनगर, संगमनेर), जयनेश धर्मेंद्र शहा (रा. (रा.शिवाजीनगर. संगमनेर), सागर मोहन पंजाबी (रा. विद्यानगर, संगमनेर), प्रसाद मयय्या गुंडेला (रा. इंदिरानगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.  

संगमनेर शहरानजीक असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारातील हॉटेल ग्रीन लीप शेजारी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती नगरच्या गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा छापा टाकला. यावेळी २७ हजार रुपयांचे हुक्क्याचे काचेचे व स्टीलचे नऊ पॉट, दोन हजार ६० रुपयांचे १३ रबरी पाइप आणि विविध कंपन्यांचे अर्धवट वापरलेले सुगंधी केमिकलचे डबे व इतर साहित्य असा एकूण ५५ हजार ७५० रुपयांचा मद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर संपत चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Raid on hookah parlor in Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here