Accident: संगमनेर पुणे नाशिक महामार्गावर कार पलटी होऊन अपघात
Sangamner Accident: कुरकुंडी शिवारात कार पलटी होऊन अपघात, दोघे बचावले.
संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंडी शिवारात बुधवार (ता.७) सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास कार पलटी अपघात झाला. या अपघातात दोघेजण बालंबाल बचावले आहे
याबाबत अधिक ,महिती अशी की, कारचालक अजय चंद्रकांत मोरे, चंद्रकांत मोरे हे दोघे (रा.नायकवाडी प्लॉट, बार्शी, जि.सोलापूर) हे नाशिकला गेले होते. बुधवारी सकाळी नाशिक येथून संगमनेर मार्गे पुण्याच्या दिशेने जात असताना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंडी शिवारात उजव्या बाजूचा टायर फुटल्याने कार थेट महामार्गावर उलटली. परंतु, दोघांनीही सीटबेल्ट लावल्याने ते बालंबाल बचावले असून एकास किरकोळ खरचटले आहे. पुणे नाशिक महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
Web Title: Car overturned accident on Sangamner