Home पुणे Murder: नातवाने कटरने केले आजीच्या मृतदेहाचे तुकडे

Murder: नातवाने कटरने केले आजीच्या मृतदेहाचे तुकडे

Murder Case: आजीचा खून करून, नंतर तिचे लाकडे कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार.

Murder Case grandson cut the grandmother's body into pieces with a cutter

पुणे : मालमत्तेसाठी नातवाने आजीचा खून करून, नंतर तिचे लाकडे कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उषा विठ्ठल गायकवाड (६२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी साहील उर्फ गुड्डू संदीप आहे. गायकवाड (२०), संदीप विठ्ठल गायकवाड (४२) या बाप-लेकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. संदीप हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. उषा गायकवाड यांच्या मुलीने दिलेली तक्रार आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा मिळून आलेला पाय, तसेच अपहरणाच्या गुन्हा या आधारे पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.

उषा गायकवाड सरकारी खात्यातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी मुलाला काही पैसे हातउसने दिले होते. त्यामुळे मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. त्यावेळी उषा या साहील व त्याचे वडील संदीप यांना घर सोडून जाण्यास सांगत असत. त्यामुळे साहील हा नेहमीच आजीवर चिडून असायचा. त्याने ५ ऑगस्ट रोजी उषा या घरात झोपल्या असताना,

दुपारी त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, त्यांचा मोबाइल त्यांच्या काशेवाडी परिसरात ठेवून दिला. झाडे कापण्याचे इलेक्ट्रिक कटर घेऊन उषा यांच्या शरीराचे तुकडे केले.

यानंतर ते तुकडे दुचाकी व चारचाकी गाडीतून मुळा-मुठा नदीपात्रात, तसेच थेऊर येथील नदीच्या पुलावरून पाण्यात टाकून दिले. घरी येऊन इलेक्ट्रिक कटर व रक्ताने भरलेले कपडे मांजरी नदीपात्रात टाकून दिले.

क्राइम पेट्रोल, दृश्यम पाहून रचला कट

■ साहील याने क्राइम पेट्रोल आणि दृश्यम हा चित्रपट पाहून अतिशय थंड डोक्याने हा गुन्हा केला.

■ उषा यांचे वजन जास्त असल्याने, त्याने त्यांचे डोक्यापासून पायापर्यंत लहान लहान तुकडे केले. पोत्यात भरून वेगवेगळ्या ठिकाणी नदीच्या पाण्यात फेकून दिले. पोलिसात वडिलांना सोबत घेऊन आजी बेपत्ता झाल्याची तक्रार केली.

Web Title: Murder Case grandson cut the grandmother’s body into pieces with a cutter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here