Home अकोले कोतूळ: पिंपळगाव खांड धरणात कार बुडाली, चालक ठार दोघे वाचले

कोतूळ: पिंपळगाव खांड धरणात कार बुडाली, चालक ठार दोघे वाचले

car sank in Pimpalgaon Khand dam

कोतूळ | Pimpalgaon Khand Dam: गुगल मॅपने रस्ता दाखवत प्रवास करणारे प्रवासी चालले असता पूल बंद असल्याचे कोणतेही फलक सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाने न लावल्याने धरणाच्या पाण्यात कार जाऊन बुडाली. ही घटना शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. यात कार चालकाचा मृत्यू झाला तर दोन जण बचावले आहेत.

शनिवारी रात्री पुणे येथील सत्याराज शेखर व मित्र समीर सुधीर राजूरकर, चालक सतीश घुले वय ३५ हे आपल्या इंडीव्हो फोर्ड कारने कळसुबाईकडे निघाले होते. कोतूळ मध्ये आल्यावर गुगल मॅपवर कोतूळ राजूर राज्यामार्गाचा रस्ता असताना गुगल मॅपने कोतूळ अकोले असे दाखविल्याने हे रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास कोतूळ पुलाच्या रस्त्याने निघाले. पावसाने रस्ता ओला होता/ समोर पूल असल्याचे कोणतेही फलक नसल्याने सरळ ते पिंपळगाव धरणाच्या पाण्यात गेले. तिघेही खिडकीतून बाहेर आले. दोघे जण पोहत कडेला आले मात्र चालक सतीश घुले याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. रात्रीच शोध कार्य सुरु होती.

या घटनास्थळी संगमनेर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व अकोले पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमने घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: car sank in Pimpalgaon Khand dam Kotul

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here