Home संगमनेर संगमनेर: रस्त्यातील खड्ड्यांमुळे गव्हाचा ट्रक पलटी

संगमनेर: रस्त्यातील खड्ड्यांमुळे गव्हाचा ट्रक पलटी

Sangamner Accident Truck rivers on the road

संगमनेर | Sangamner Accident : संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथील उप रस्त्यांत असलेल्या खड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहूने भरलेला ट्रक शेतात पलटी झाल्याची घटना शनिवारी ९ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालक सुदैवाने बचावला आहे. यामध्ये गहू व ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

साकुर येथून सातारा या ठिकाणी गव्हाच्या गोण्या घेऊन जाणारा मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच. १२ सी.टी. ०१८८) शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास साकुर फाटा येथे आला असता उप रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे चालकाला अंदाज न आल्याने ट्रक लगत असलेल्या चाळीस फुट खोल शेतात पलटी झाला. या अपघातात गव्हाच्या गोण्या फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. ट्रक चालक बचावला आहे.  

Web Title: Sangamner Accident Truck rivers on the road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here