Home महाराष्ट्र Anushka Virat Baby: विराट अनुष्का झाले आई बाबा

Anushka Virat Baby: विराट अनुष्का झाले आई बाबा

Anushka Virat First Baby Girl

Anushka Virat First Baby: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. स्वतः विराट कोहलीने सोशियल मेडीयावर आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

विराट कोहली व बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न झाले होते. विराटने आपल्या  पोस्टमध्ये लिहिले आहे की, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की,  आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे, असं विराटनं म्हटलं आहे.

विराट कोहली हा आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी कसोटी मालिका सोडून ऑस्ट्रेलियाहून भारतात आला आहे. त्याने ऑस्ट्रेलियात एकदिवसीय व २०-२० मालिका खेळल्यानंतर तो लिव्ह घेऊन शेवटचे तीन कसोटी सामने सोडून भारतात परतला आहे. आता विराट आणि अनुष्काच्या मुलीचे आगमन झाले असून चाहत्यांमध्ये तिला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

Web Title: Anushka Virat First Baby Girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here