Home अहमदनगर मंगलाष्टक सुरु असताना नवरदेवाची प्राणज्योत मालवली

मंगलाष्टक सुरु असताना नवरदेवाची प्राणज्योत मालवली

Karjat Navardeva lost when Mangalashtak started

कर्जत | karjat: कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे रविवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली आहे. विवाहात मंगलाष्टक सुरु असताना नवरदेवाला हृदयविकाराचा त्रास झाल्याने मृत्यू झाला. 

विवेक प्रकाश जगताप रा. भूम जि. उस्मानाबाद असे या मयत नवरदेवाचे नाव आहे. चिलवडी येथील दिलीप धोंडीराम राउत यांच्या मुलीचा विवाह हे भूम तालुक्यातील विवेक प्रकाश जगताप यांच्याशी होता. हा विवाह सोहळा चिलवडी येथील करमाळा रस्त्यावर असणाऱ्या नागेश्वर मंदिरात पार पडत होता. रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मंगलाष्टके सुरु असताना चार मंगलाष्टके झाली होती. उपस्थित पाहुणे मंडळी वधू वरांना शुभशीर्वाद दिले. शेवटचे मंगलाष्टक होणार तेच नवरदेवाला चक्कर आली. वर बाप व संयाजोक मंडळीची एकच धावपळ उडाली. लग्न मंडपात कोसळलेल्या नवरदेवाला लगेचच राशीन येथील खासगी रुग्णालयात दाखल केले तेथे तपासणी केली असता नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविचेदन करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने विवेक यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले. या विवाहासाठी मिरवणुकीत नवरदेवाने डीजे गाण्यावर नृत्य केल्याचे नागरिकांत चर्चा होती.

Web Title: Karjat Navardeva lost when Mangalashtak started

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here