Home संगमनेर संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्या धडकेत चिमुकली ठार

संगमनेर:  नाशिक पुणे महामार्गावर कंटेनर व दुचाकीच्या धडकेत चिमुकली ठार

Sangamner container bike Accident child death 

संगमनेर | Sangamner:  संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक पुणे महामार्गावर कंटेनरने दुचाकीला पाठूमागून धडक दिल्याने गाडीवरील चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात चार जण जखमी झाले आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, काटवनवाडी (डोळासणे) येथील नामदेव अंकुश पारधी व पत्नी मंगल नामदेव पारधी हे आपल्या १० वर्षाच्या मुलगी प्रतीक्षा ही आजारी असल्याने मोटारसायकलवरून घारगाव येथील दवाखान्यात गेले होते. दवाखान्यातून औषधे उपचार घेऊन परत जात असतना घारगाव बस स्थानकाजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या मालवाहू कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात आई मंगल यांच्या हातातून मुलगी प्रतीक्षा सुटल्याने महामार्गावर पडली. यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आई मंगल व वडील नामदेव पारधी हे जखमी झाले आहे.

तसेच या कंटेनरने काही अंतरावर उभे असलेल्या दोघांनाही जोराची धडक दिली. यामध्ये नवनाथ सखाराम गाढवे व शिवाजी रामचंद्र भागवत हे जखमी झाले आहेत. या सर्वांना संगमनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती समजताच पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी कंटेनर चालकाचा पाठलाग करीत त्यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner container bike Accident child death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here