Home अहमदनगर राहता तालुक्यात लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस

राहता तालुक्यात लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस

Ahmednagar News:  अल्पवयीन मुलीला लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

a case of love jihad in Rahata Taluka was revealed

राहता: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रवरा परिसर आता लव्ह जिहादची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीला लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे.

हुजेब शकील शेख व साहिल सलीम शेख (रा. प्रवरानगर ता. राहाता) या आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला सातत्याने त्रास देत लग्नासाठी आरोपी गळ घालत होता, तसेच शाळेत जाताना-येतांना रस्त्यातच आरोपींनी वारंवार विनयभंग केल्याने या त्रासाला कंटाळून मुलीच्या घरच्यांना गावही सोडावं लागल तरीही आरोपीकडून त्रास देणं सुरूच होते. लग्नासाठीही आरोपीकडून बळजबरी सुरूच होती. या त्रासाला कंटाळून मुलीच्या वडीलानी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रवरानगर येथील दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहेत. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. हुजेब शकिल शेख आणि साहिल सलीम शेख यादो घां आरोपीविरुद्ध 354, 354 (ड) अक्ट 8 व 12 प्रमाणे पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात अशाच घटनांविरोधात बेलापूर गांव बंद करून निषेध व्यक्त करीत आहे. त्यातच पुन्हा ही लव्ह जिहादची घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पीएसआय आशिष चौधरी करीत आहेत.

Web Title: a case of Love jihad in Rahata Taluka was revealed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here