Home संगमनेर संगमनेर: विवाहितेचा विनयभंग गुन्हा दाखल

संगमनेर: विवाहितेचा विनयभंग गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner:  अतिक्रमण काढण्यावरून विवाहितेच्या सासऱ्याला मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार.

the case of molestation of a married woman has been filed

संगमनेर: तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील अतिक्रमण काढण्यावरून विवाहितेच्या सासऱ्याला मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हिवरगाव पावसा येथील ग्रामपंचायतीच्या नावाखाली रस्ता रूंदीकरण्याच्या संदर्भातील अतिक्रमण काढण्याचे काम सुरु आहे. यावेळी शिवारातील एका विवाहितेच्या कुटुंबाला कोणतीही नोटीस न देता गोठ्याचे अतिक्रमण काढले व अतिक्रमणमधील झाडे काढले. त्याचवेळी विवाहितेच्या सासऱ्याला दशरथ भाऊसाहेब पावसे याने मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सागर किसन पावसे हा खासगी जेसीबीसह एक महिला, गंगाराम रावसाहेब पावसे, नवनाथ लहानू पावसे, निलेश नानासाहेब पावसे, दशरथ रावसाहेब पावसे, संदीप बाबासाहेब पावसे यांना घेऊन आला. त्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली तेव्हा तुम्ही आम्हाला नोटीस न देता अतिक्रमण का काढले अशी विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ केली. संदीप पावसे याने विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. जर तुम्ही अतिक्रमण काढू दिले नाही तर तुमचे तुकडे करेल अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. शेवटी गोठ्याची ताडपत्री काढून जाळून टाकली. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून वरील सात जणांवर तालुका पोलिसांनी भादंवि कलम ३५४, १४३, ४२७, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. वायळ हे करत आहे.

Web Title: the case of molestation of a married woman has been filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here