Home क्राईम बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये घेतले पेटवून

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये घेतले पेटवून

Rape Case: महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केल्याने संतप्त तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू.

case of rape was registered, the young man was taken to the police station and set on fire

पिंपरी चिंचवड: बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने तरुणाने  स्वतःला थेट पोलीस स्टेशनमध्ये पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये  ही घटना समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज हाती लागलं आहे. यात जखमी झालेल्या व्यक्तीचा मंगळवारी (6 डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस स्टेशनमध्ये ही घटना 2 डिसेंबरच्या रात्री घडली होती. 2 ऑक्टोबरला मयत इसम 19 वर्षीय पीडितेच्या घरी गेला होता. पीडिता एकटी घरी असल्याचा त्याने गैरफायदा घेतला आणि धमकावून, बळजबरीने शरीर संबंध ठेवले, असा आरोप पीडित महिलेने केला. तसेच 20 नोव्हेंबरला पीडिता घरी एकटीच असल्याचं पाहून तो पुन्हा आला आणि ‘माझ्यासोबत लग्न कर अथवा आत्तापर्यंत मी तुझ्यावर खर्च केलेले पैसे परत कर’ असं म्हणत त्याने भांडणं केलं. यावर माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करू, असं पीडिता म्हणाली. त्यामुळं संबंधित व्यक्ती संतापला आणि त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर तुला आणि तुझ्या भावाला जीवे मारेन अशी धमकी दिली, असे आरोप करत पीडित महिलेने 1 डिसेंबरला गुन्हा दाखल केला.

Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business

हा बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल झाल्यानं तरूणाला  मोठा धक्का बसला. या धक्क्यातून तो स्वतःला सावरू शकला नाही. यातूनच त्याने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये 2 डिसेंबरला स्वतः पेटवून घेतलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली. त्यानंतर होरपळलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिवाय आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आला. अशातच चार दिवसांनी म्हणजेच मंगळवारी (6 नोव्हेंबर) त्याचा मृत्यू झाला.

या सर्व प्रकरणाची पोलीस सखोल तपास करत आहेत. या सगळ्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्या फुटेजमध्ये व्यक्ती होरपळून पळताना दिसत आहे.  पोलीस त्या व्यक्तीचा बचाव करण्यासाठी पळताना दिसत आहे.

Web Title: case of rape was registered, the young man was taken to the police station and set on fire

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here