Home अहमदनगर Accident: टँकर व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार

Accident: टँकर व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार

Ahmednagar Accident:  टँकरने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला.

One person was killed in a collision between a tanker and a bike

राहता:  नगर कोपरगाव महामार्गावर बाभळेश्वर चौकात राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील उत्तम दगडु पारखे (वय 54) यांचे अपघाती निधन झाल्याची घटना घडली आहे.  मंगळवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. मयत उत्तम पारखे व त्यांच्या पत्नी शोभा पारखे दुचाकीवरून जात असताना टँकरने त्यांना धडक दिली.

या अपघातात  त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीवर प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  उत्तम पारखे पिंपरी निर्मळ येथील ग्रामपंचायतीचे सलग दहा वर्षे सदस्य होते. त्यांच्या अपघाती निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business

त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे. नगर-कोपरगाव रस्त्याची दुरवस्था व बाभळेश्वर चौकातील अर्धवट काम झालेल्या पुलामुळे या परीसरात नेहमी अपघात घडत आहेत. त्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागत आहे.

Web Title: One person was killed in a collision between a tanker and a bike

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here