Home क्राईम चला वाहिनी तुम्हाला घरी सोडतो, महिलेला घरी सोडून केला बलात्कार- Rape

चला वाहिनी तुम्हाला घरी सोडतो, महिलेला घरी सोडून केला बलात्कार- Rape

Rape news:  धमकी देऊन महिलेवर बलात्कार.

Chala Vahini leaves you at home, rape left the woman at home

सुपे : कोरोनाची लस घेऊन घरी निघालेल्या महिलेला तुम्हाला दुचाकीवरुन घरी सोडतो असे सांगून महिलेच्या घरी गेल्यावर धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना बारामती तालुक्यातील कारखेल येथे घडली. तुषार लालासो भापकर (रा. कारखेल, ता बारामती जि. पुणे) असे आरोपीचे नाव असुन याबाबत महिलेने त्याच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कारखेल प्राथमिक आरोग्य केंद्र येथून कोविद्ध १९ ची प्रतिबंधक लस घेवुन महिला घरी रस्त्याने पायी निघाली होती. त्यावेळी पायी चालत जात असताना आरोपीने स्वतःच्या दुचाकीवरुन फिर्यादीस वहीणी तुम्हाला घरी सोडतो असे म्हणुन फिर्यादीस त्यांच्या घरी नेले. त्यावेळी त्याने वहिणी तुम्ही मला खुप आवडता असे म्हणुन फिर्यादीस छातीशी धरून बेडवर झोपवुन तोंड दाबुन तिचेवर बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर तु ओरडु नकोस नाहीतर तुला खल्लास करीन अशी धमकी दिली. यावेळी तीचे व त्याचे फोटो काढुन त्याने वेळोवेळी फिर्यादीस काढलेले फोटो सगळीकडे व्हायरल करुन तुझे नाव नव-यास व मुलांना सांगितले जाईल अशी धमकी देत होता. तसेच तुला खल्लास करीन अशी धमकी देवुन त्याने वेळोवेळी फिर्यादीच्या घराच्या पाठीमागे तसेच खामगळवाडी येथील मयुरी लॉज व मोरगाव येथे मोरया लॉज वर नेवुन तेथे तिचेवर बलात्कार केल्याची घटना ९ डिसेंबर २०२१ पासुन २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडली.

दरम्यान वडगाव निंबाळकर पोलिसांकडून आरोपीस ३७६ (२) (एन), ५०६ असे भादवी कलम लावले असल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक सलीम शेख यांनी दिली. बारामती न्यायालयात हजर केले असता आरोपीस पाच दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आल्याची माहिती वडगाव निंबाळकरचे सपोनी सोमनाथ लांडे यांनी दिली.

Web Title: Chala Vahini leaves you at home, rape left the woman at home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here